1 Samuel 2

1मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली, माझे ह्रदय देवाच्या ठायी आनंद पावत आहे; माझे शिंग देवाच्या ठायी उंच केले आहे; माझे मुख माझ्या शत्रूविरूद्ध धैर्याने बोलत आहे, कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदित होत आहे.

2देवासारखा कोणी पवित्र नाही, कारण तुझ्या शिवाय कोणी नाही, आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही,

3अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका; तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण न निघो. कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे; त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात. 4पराक्रम्याची धनुष्ये मोडलेली आहेत आणि जे अडखळले ते बलाने वेष्टीलेले आहेत.

5जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत; आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत. वांझ होती तिने सातांस जन्म दिला आहे, परंतु फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे.

6यहोवा जिवे मारतो व जिवनात आणतो. तो अधोलोकास नेतो व वर आणतो. 7परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो. तो नम्र करतो, तसेच तो उंचही करतो.

8तो गरीबाला धुळीतून वर उठवतो; तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो; यासाठी की त्यांना राजपुत्राबरोबर बसवावे व त्यांना वारसाने सन्मानाचे आसन मिळावे. कारण पृथ्वीचे खांब देवाचे आहेत; त्याने त्यावर जग ठेवले आहे.

9तो आपल्या विश्वासणाऱ्या लोकांचे पाय संभाळील, परंतु दुष्ट अंधारांत शांत ठिकाणी ठेवले जातील, कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही.

10देवाशी विरोध करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केले जातील; आकाशांतून तो त्याच्याविरूद्ध मेघगर्जना करील. परमेश्वर पृथ्वीच्या शेवटल्या टोकावर असलेल्यांचा न्याय करील; तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करील.

11मग एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला. आणि तो लहान मुलगा एली याजकासमोर देवाची सेवा करू लागला.

12एलीची मुले नालायक माणसे होती; ते देवाला ओळखत नव्हते. 13लोकाच्या बाबतीत याजकांची अशी रीत होती की कोणी मनुष्य यज्ञ अर्पण करू लागला की, मांस शिजत असतानाच याजकाचा चाकर मांस उचलण्यासाठी तीन अणकुचीदार टोकाचा काटा आपल्या हातात घेऊन येई 14तो परातीत किंवा तपेल्यांत किंवा कढईत किंवा पातेल्यांत तो काटा घुसवत असे आणि तो काटा जे सर्व धरून काढी, ते याजक आपणासाठी घेई. जे इस्राएली लोक शिलो येथे येत त्या सर्वांना ते तसेच करत असत

15त्यांनी चरबी जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की याजकासाठी मांस भाजण्यास दे कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर फक्त कच्चे घेईल. 16जर त्या मनुष्याने त्याला असे म्हटले की, अगोदर ते चरबी जाळतील मगच तुला पाहिजे तेवढे तूं घे; तर तो म्हणे असे नाही, पण तूं आताच दे नाही तर मी ते बळजबरीने घेईन. 17हे त्या तरुणाचे पाप देवाच्यासमोर फार मोठे होते कारण त्यामुळे देवासाठी अर्पण आणण्याचा लोकांना तिरस्कार वाटू लागला.

18परंतु शमुवेल बाळ तर तागाचे वस्त्र एफोद घालून देवाची सेवा करीत होता. 19त्याची आई त्याच्यासाठी लहान अंगरखा करीत असे आणि प्रत्येक वर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करावयास येई त्यावेळी त्याला तो देत असे.

20एलकानाला व त्याच्या बायकोला एली आशीर्वाद देऊन म्हणत असे या बायकोपासून यहोवा तुला संतान देवो कारण जे तिने देवाकडे विनंती करून मागितले त्याला परत दिले मग ते आपल्या घरी जात असत. 21आणि परमेश्वराने हन्नेला पुन्हा मदत केली ती गरोदर झाली. तिने तीन मुलांना व दोन मुलीना जन्म दिला दरम्यानच्या काळात शमुवेल बाळ यहोवाच्यासमोर वाढत गेला.

22आता एली फार म्हातारा झाला होता आणि आपले मुलगे सर्व इस्राएलांशी कसे वागले आणि सभामंडपाच्या प्रवेशदाराजवळ ज्या स्त्रीया सेवा करीत त्यांच्यांपाशी ते कसे निजले हे सर्व त्याने ऐकले. 23तेव्हा तो त्यांना म्हणाला तुम्ही अशी कृत्ये का करता? कारण तुमची वाईट कृत्ये या सर्व लोकांपासून मी ऐकली आहेत. 24माझ्या मुलांनो असे करू, नका कारण जी बातमी मी ऐकतो ती चांगली नाही; तुम्ही देवाच्या लोकांना आज्ञाभंग करायला लावता.

25जर कोणी एक माणूस दुसऱ्याविरुद्ध पाप करील तर परमेश्वर त्याचा न्याय करील. पण जर माणूस देवाच्या विरूद्ध पाप करील तर त्यासाठी कोण मध्यस्थी करेल? पण ते आपल्या बापाचे शब्द ऐकेनात कारण त्यांना जिवे मारावे असा देवाचा हेतू होता. 26शमुवेल बाळ हा मोठा झाला आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला.

27आता देवाचा एक माणूस एलीकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या पूर्वजांचे घराणे मिसरात फारोच्या दास्यात राहत असता मी त्याला प्रगट झालो नाही काय? 28आणि त्याने माझा याजक व्हावे माझ्या वेदीकडे धूप जाळायला वरती जावे माझ्यासमोर एफोद धारण करावे म्हणून मी त्याला सर्व इस्राएलाच्या वंशातून निवडून काढले नाही काय? आणि इस्राएलाच्या लोकांनी अग्नीतून केलेली सर्व अर्पणे मी तुझ्या पूर्वजांच्या घराण्याला दिली नाहीत काय?

29तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण मी जिथे राहतो तिथे आज्ञापिले आहे, त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्राएलांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्यांकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यांपेक्षा आपल्या मुलांचा तू का अधिक आदर करतोस? 30यामुळे इस्राएलांचा परमेश्वर म्हणतो, की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे; परंतु आता परमेश्वर असे म्हणतो, ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो कारण जे माझा आदर करतात त्यांचा आदर मी करीन आणि जे मला तिरस्कार करतात त्यांचा अवमान होईल.

31पाहा असे दिवस येत आहे की, ज्यात मी तुझे सामर्थ्य व तुझ्या बापाच्या घराण्याचे सामर्थ्य कापून टाकीन आणि तुझ्या घराण्यात कोणी म्हातारा होणार नाही. 32जरी इस्राएलाला जे सर्व चांगले दिले जाईल तरी जिथे मी राहतो त्या जागी दुःख पाहशील आणि तुझ्या घराण्यात सर्वकाळ कधी कोणी म्हातारा होणार नाही. 33आणि तुझा जो माणूस मी आपल्या वेदीपासून काढून टाकणार नाही, त्याला जिवंत राखले जाईल यासाठी की, तो तुझे डोळे क्षीण करणारा व तुझ्या ह्रदयाला खेद देणारा होईल. आणि तुझ्या घराण्याची सर्व संतती ऐन तरुणपणात मरेल.

34आणि तुझे दोघे मुलगे हफनी व फिनहास यांच्यावर जे येईल तेच तुला चिन्ह होईल; ते दोघेही एकाच दिवशी मरतील. 35मी आपणासाठी विश्वासू याजक उभा करीन; तो माझ्या ह्रदयात व माझ्या मनांत जे आहे त्याप्रमाणे करील. मी त्याचे घराणे निश्चित स्थापील; आणि तो माझ्या अभिषिक्त राजासमोर निरंतर चालेल.

असे होईल की तुझ्या घराण्यातील प्रत्येक जण जो कोणी राहिलेला आहे तो येऊन रुप्याच्या तुकड्यासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यापुढे नमन करील आणि म्हणेल की, मी तुला विनंती करतो मला भाकरीचा तुकडा खाण्यास मिळावा म्हणून मला याजकपदातले एखादे काम दे.

36

Copyright information for MarULB